Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बनावट आरटीपीसीआर अहवाल देणे भोवले; सुरक्षा रक्षकासह एकावर गुन्हा दाखल
    क्राईम

    बनावट आरटीपीसीआर अहवाल देणे भोवले; सुरक्षा रक्षकासह एकावर गुन्हा दाखल

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रFebruary 6, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email



    जळगाव प्रतिनिधी । जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बनावट आरटीपीसीआर अहवाला दिल्याप्रकरणी सुरक्षा रक्षकासह ऑपरेटर यांच्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    राजेंद्र विठ्ठल दुर्गे रा. जळके विटनेर ता.जि.जळगाव आणि डाटा एंट्री ऑपरेटर स्वप्निल पांडूरंग पाटील रा. जळगाव असे संशयित आरोपींचे नाव आहे. सविस्तर माहिती अशी की, प्रसारमाध्यमांमध्ये जिल्हा सामान्य रूग्णालयात बोगस आरटीपीसीआर अहवाल मिळतात याबाबत माहिती प्रसिद्ध झाली होती. त्या अनुषंगाने अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी शल्यचिकित्सा विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.प्रशांत देवरे यांच्या अध्यक्षतेखाली व उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर, डॉ. संदीप पटेल यांच्या सदस्यत्वाखालील समिती नेमली होती.

    या समितीने तीन दिवस सखोल चौकशी करून निष्पक्ष अहवाल तयार केला. एकूण ३८ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहे. अहवाल शनिवारी ५ फेब्रुवारी रोजी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना सादर केला. त्यानुसार अहवाल वाचून अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी दोषी सुरक्षारक्षक राजेंद्र दुर्गे आणि डाटा एंट्री ऑपरेटर स्वप्नील पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांना दिले आहे.

    त्यानुसार वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय गायकवाड यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी राजेंद्र विठ्ठल दुर्गे रा. जळके विटनेर ता.जि.जळगाव आणि डाटा एंट्री ऑपरेटर स्वप्निल पांडूरंग पाटील रा. जळगाव यांच्याविरोधात बनावट आरटीपीसीआर रिपोर्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.