• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चालकच निघाला चोर; कंटेनरमध्यून साडेतीन लाखांच्या चोरी केली कबुली, दोघांना अटक

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
February 6, 2022
in क्राईम, जळगाव
0
चालकच निघाला चोर; कंटेनरमध्यून साडेतीन लाखांच्या चोरी केली कबुली, दोघांना अटक

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील रामदेववाडी गावाजवळ बंद पडलेल्या कंटेनरमधून टायर, ट्यूब व इतर साहित्य असा एकुण ३ लाख ३६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लांबविणाऱ्या कंटेनर चालकासह एकाला एमआयडीसी पोलीसांनी आज पहाटे अटक केली. दोघांवर एमआयडीसीत गुन्हा दाखल झाला आहे.

कंटेनर चालक सलमान खान सलीम खान पठाण (वय-२७) आणि त्याचा साथीदार अमीर शेख नाशिर मण्यार (वय-२०) दोन्ही रा. कजगाव ता. भडगाव जि.जळगाव असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

यासंदर्भात माहिती अशी की, जळगाव येथील एस.के. ट्रान्सलाईन येथील कंपनीच्या मालकीच्या कंटेनर (MH-१९, CY-२२८१ ) मध्ये पुण्यातील ब्रिजस्टोन टॉयर कंपनीचा सुमारे ३ लाख ३६ हजार माल भरून गुहाटीकडे रवाना झाला. शुक्रवार ४ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता कंटनेर घेवून जळगाव कडे येत असतांना तालुक्यातील रामदेववाडी येथील रस्त्यावर त्यांचा कंटेनर बंद पडला. सलमान खान सलीम खान पठाण हे अंधार असल्यामुळे रस्त्याच्या बाजूला कंटेनर थांबून तिथेच झोपले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कंटेनरचे दरवाजाचे सील तोडून मध्ये ठेवलेला ३ लाख ३६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे शनिवारी ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ४ वाजता उघडकीला आले. सायंकाळी ७ वाजता जळगाव येथील एस.के. ट्रान्सलाईनचे मॅनेजर रामदास साहेबराव खैरनार यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात न्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलीसांनी कंटेनर चालक सलमान खान सलीम खान पठाण यांची चौकशी केली असता समाधानकारक उत्तर न दिल्याने पोलीसांच्या त्यावर संशय बळावला. त्याला खाक्या दाखवताच त्यानेच साथीदार अमीर शेख नाशिर मण्यार याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन मुंडे, हेमंत पाटील, स्वप्नील पाटील, प्रदीप पाटील, किशोर पाटील, मुकेश पाटील यांनी संशयित आरोपी सलमान खान सलीम खान आणि अमीर शेख नाशिर मण्यार यांना अटक केली.

Previous Post

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड

Next Post

बनावट आरटीपीसीआर अहवाल देणे भोवले; सुरक्षा रक्षकासह एकावर गुन्हा दाखल

Next Post
बनावट आरटीपीसीआर अहवाल देणे भोवले; सुरक्षा रक्षकासह एकावर गुन्हा दाखल

बनावट आरटीपीसीआर अहवाल देणे भोवले; सुरक्षा रक्षकासह एकावर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘त्या’ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना १० लाखांची मदत करा : विरोधी पक्षनेते आक्रमक !
राजकारण

‘त्या’ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना १० लाखांची मदत करा : विरोधी पक्षनेते आक्रमक !

July 2, 2025
पहिल्या नोकरीवर मिळणार 15 हजार रुपये ; केंद्र सरकारचा निर्णय !
राजकारण

पहिल्या नोकरीवर मिळणार 15 हजार रुपये ; केंद्र सरकारचा निर्णय !

July 2, 2025
“जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो ;  अंजली दमानिया यांचे ट्वीट !
राजकारण

“जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो ; अंजली दमानिया यांचे ट्वीट !

July 2, 2025
ठाकरेंनी स्वतःच्या मुलांना स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे ; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरेंनी स्वतःच्या मुलांना स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे ; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल !

July 2, 2025
तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !
Uncategorized

तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !

July 2, 2025
धरणगावनजीक गुरांना खाली उतरवून वाहनच टाकले जाळून !
अमळनेर

अमळनेरात देहविक्री करणाऱ्या महिला आणि ग्राहकांना अटक !

July 2, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group