मुंबई वृत्तसंस्था । आपल्या सुमधूर आवाजाने गेली ६० वर्षे रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाल आहे. त्या ९१ वर्षांच्या होत्या. मुंबईतील ब्रीच कँन्डी रुग्णालयात गेल्या महिन्याभरापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना कोरोना झाला होता. आज सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टी, संगीतसृष्टी आणि अवघा भारत पोरका झाला आहे. त्यांच्या निधनाने भारताचं रत्न गेल्याची भावना सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे. दुपारी 12 वाजता त्यांचं पार्थिव त्यांच्या पेडर रोडवरच्या त्यांच्या घरात अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतल्या शिवाजी पार्कवर आज संध्याकाळी 5.30 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
लतादीदींची तब्येत खालावल्याची बातमी समोर आल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे तातडीने ब्रीड कँन्डी हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे त्यांच्या तब्येतीबाबत विचारपूस केली. नंतर संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनीदेखील दीदींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. रात्री अनेक नेत्यांनी ब्रीड कॅंडी रुग्णालयात फोन केले. पण आज अखेर त्यांनी त्याची प्राणज्योल मालवली.