Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अमळनेरात बस चालकाला जबर मारहाण !
    अमळनेर

    अमळनेरात बस चालकाला जबर मारहाण !

    editor deskBy editor deskOctober 28, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी

    बस ओव्हरटेक करण्यावरून वाद झाल्याने ट्रॅव्हल्स चालकाने एसटी चालकाला मारहाण केल्याची घटना चोपडाई-कोंढावळ तपासणी नाक्याजवळ घडली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा बसडेपोत चालक असलेल्या भटू निळकंठ पाटील (४६) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते २५ रोजी सायंकाळी पुणे येथून चोपडा बस (एमएच०९/ईएम ९६५३) घेऊन निघाले होते. २६ रोजी सकाळी ७:४५ वाजण्याच्या सुमारास फागणेजवळ बस जात असताना पुढे असलेल्या विनोद ट्रॅव्हल्सच्या खासगी बसला (एमएच०९/सीव्ही २७०९) ओव्हरटेक करत असताना चालकाने बाजू न देता जोरात गाडी पुढे घेतली.

    समोरून ट्रक असल्याने एसटी चालक भटू पाटील यांना अचानक ब्रेक लावला. त्यामुळे उभा असलेला एक प्रवासी खाली पडला. ट्रॅव्हल्स चोपडाई-कोंढावळ तपासणी नाक्याजवळ उभी असताना बस चालक भटू पाटील यांनी ट्रॅव्हल्स चालकाला जाब विचारला. ट्रॅव्हल्स चालक दैवत वाल्मिक पाटील (जळोद) याला राग आल्याने त्याने बसच्या दरवाजाला लाथा मारत भटू पाटील यांना शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी प्रवासी व वाहक यांनी पाटील यांची सोडवणूक केली. तपास हेकॉ. कैलास शिंदे हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    प्रेमसंबंधांचा थरारक शेवट; ८ महिन्यांच्या गरोदर प्रेयसीवर विषप्रयोग : प्रियकर अटकेत !

    February 27, 2026

    अजित पवार विमान दुर्घटनेवरून राज्यात खळबळ; कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार आक्रमक

    February 27, 2026

    कार्यक्रमावरून परतताना अपघात; खा.संजय देशमुखांच्या वाहनाचा अपघात !

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.