जळगाव – स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव रविवार, १५ ऑगस्ट रोजी गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तसेच जळगाव येथील गोदावरी इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर देशभक्तीमय झाला.
गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त डॉ.उल्हास पाटील यांनी उपस्थीतांना शुभेच्छा दिल्यात. तसेच डॉ.वैभव पाटील यांनी देखील स्वातंत्र्य दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, डॉ.केतकी पाटील यांच्यासह डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्टाफ उपस्थीत होता. कोरोना नियमांचे पालन करुन स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
गोदावरी स्कूलमध्ये ध्वजारोहण उत्साहात
जळगाव – स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव गोदावरी इंग्लिश स्कूलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, डॉ.वर्षा पाटील, डॉ.केतकी पाटील, गोदावरी पाटील, गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्या निलिमा चौधरी, गोदावरी इंजिनिअरींग कॉलेजचे प्राचार्य डॉ.विजय पाटील उपस्थीत होते. यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीचा संदेश देणारे देशभक्तीपर गीत स्वरचित कविता, निबंध स्पर्धा, स्वातंत्र्य सेनानींची वेशभूषा साकारली. अशा विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांनी ऑनलाईनद्वारे आपला सहभाग नोंदविला.
तसेच गोदावरी शाळेतील शिक्षकांनीही देशभक्तीपर गीत सादर केली. डॉ.विजय पाटील यांनी स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्यात. डॉ.वैभव पाटील यांनी मनोगतातून राष्ट्रभक्तीचा संदेश दिला. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमने करण्यात आली. सूत्रसंचालन रुपाली सोनार यांनी तर आभार कविता पाटील यांनी मानले.