चाळीसगावात दोन जीवलग मित्र निवडणुकीच्या आखाड्यात
चाळीसगावात मविआ मित्रपक्षांमध्ये नाराजी; राष्ट्रवादी अपक्ष उमेदवार देण्याच्या तयारीत !
लाईव्ह महाराष्ट्र प्रतिनिधी । चाळीसगाव विधानसभा निवडणूकीत नेहमी राष्ट्रवादी काँग्रेसला जागा मिळालेली आहे. असे असतांना महाविकास आघाडीच्या उबाठातर्फे ही जागा सुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते नाराज झाले आहे. शरद पवार गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची चिंतन बैठक झाली. या बैठकीत अपक्ष उमेदवार देण्याचा विचारात असल्याचे समोर आले असून आता मित्र पक्षातील उमेदवाराच चिंता वाढविणारी ठारणार असल्याचे पहायला मिळणार आहे.
आमदार मंगेश चव्हाण व माजी खासदार उमेश पाटील हे दोघे एका काळाचे खास जिवलग मित्र. या जिवलग मित्रांनी २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार राजीव देशमुख यांच्याविरुद्ध राजकीय रान उठवले. जनतेनेही प्रतिसाद दिला आणि उमेश पाटील हे आमदार म्हणून विजयी झाले. त्यानंतर या दोघे मित्रांमध्ये मनभेद होऊन मतभेद झाले. दोघांनी वेगवेगळी वाट धरली, आता थेट दोघे मित्र एकमेकांच्या विरोधात विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत परंतु विकासामुळे भूमिका तसेच विजन आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे असल्यामुळे तालुक्यातील झंजावात व जनता मंगेश चव्हाण च्या सोबत असल्याचे दिसून येत आहे असे असताना ही जागा शिवसेनेला सुटल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचे प्रमाण पसरले आहे ते शिवसेना उमेदवाराला सहकार्य करण्याच्या परिस्थितीत नाहीत.
तसेच तालुक्यातील पारंपारिक मतदार म्हणजेच राज गडाला मानणारा मतदार हा शिवसेनेकडे झुकण्याची शक्यता जवळपास नामशेष आहे असे वाटते. त्यामुळे याचा सर्व फायदा भाजपाला होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेना उमेदवार यांच्या विषयी राष्ट्रवादीमध्ये फार काही चांगली भावना आहे, असे चित्र अजिबात नाही. त्यामुळे मंगेश चव्हाण हे निश्चितच वरचढ ठरणार असून तसेच एक गठ्ठा मते देखील त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांचे बेरजेचे राजकारण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले नाराजीचे सूर हे निश्चितच महाआघाडीसाठी धोकादायक आहे त्यामुळे या मतदारसंघाचा कल मात्र आता वनवे होत चाललेला आहे असे चित्र आहे. एकंदरीत महाविकास आघाडीच्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ही जागा सुटल्याने मित्र पक्षा राष्ट्रवादी काँग्रेस कमालीचा नाराज झाला आहे. त्यांनी आता नवीन उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याने ठाकरे गटाचे उमेदवार उन्मेश पाटील यांची डोकेदुखी ठरणार आहे. हे राजकीय चित्र कितपत पुढे चालते हे मात्र अजून सांगता येत नाही, परंतु आज तरी शिवसेनेच्या उमेदवाराविषयी प्रचंड नाराज आहे.