रावेर : प्रतिनिधी
मध्य प्रदेशातून पाल येथे गावठी कट्टा आणत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. यावरून तरुणाला शेरी नाका येथील तपासणी नाक्यावर जेरबंद केले. फौजदार तुषार पाटील व गुन्हे प्रकटीकरण शाखेने शनिवारी पहाटे ३:५० वाजता ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, अटकेतील तरुणाचे नाव भरत गणेश सोनवणे (वय ३२, रा. वढोदा, ता. यावल) असे आहे. त्यांच्याकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना गुप्त माहिती मिळाली होती. यावरून फौजदार तुषार पाटील व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोकॉ. समाधान ठाकूर, पो. कॉ. सचिन घुगे, प्रमोद पाटील, विकार शेख यांनी पालजवळील खरगोन रस्त्यावरील शेरी नाका मध्य प्रदेश सीमा तपासणी नाक्यावर जेरबंद केले.