मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने 15 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून अनिल गोटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर चोपड्यातून राजू तडवी यांना उमदेवारी देण्यात आली आहे. तर शिवसेनेसाठी महत्त्वाचा मनला जाणारा भायखळा मतदारसंघात मनोज जामसुतकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
धुळे शहर – अनिल गोटे, चोपडा (अज) – राजू तडवी, जळगाव शहर – जयश्री सुनील महाजन, बुलढाणा – जयश्री शेळके, दिग्रस – पवन श्यामलाल जयस्वाल, हिंगोली – रूपाली राजेश पाटील, परतूर – आसाराम बोराडे, देवळाली (अजा) – योगेश घोलप, कल्याण पश्चिम – सचिन बासरे, कल्याण पूर्व – धनंजय बोडारे, वडाळा – श्रद्धा श्रीधर जाधव, शिवडी – अजय चौधरी, भायखळा – मनोज जामसुतकर, श्रीगोंदा – अनुराधा राजेंद्र नागावडे, कणकवली – संदेश भास्कर पारकर.