जळगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात राजगड आणि पवार साहेब हे समीकरण गेल्या अनेक वर्षापासून जुडले आहे. कार्यकर्ते देखील त्याच पद्धतीने त्याच साच्यामध्ये वावरत असतात व समाजसेवेत कार्यरत असतात. परंतु राजकीय इतिहासात पहिल्यांदाच ही जागा शिवसेनेकडे गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून दगड पेक्षा वीट बरी अशी म्हण अहिराणी मध्ये आहे त्या पद्धतीने कार्यकर्ते भाजपाकडे वाटचाल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जे भावनिक नातं शिवसेना नेत्यांचे जोडायला पाहिजे होते तसे चित्र या मतदारसंघात दिसत नाही यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाला आहे. तसेच जिल्हाध्यक्षांच्या मनातही आपली उमेदवारी कट झाल्याचे शैल्य असल्यामुळे कितपत मैदानात ते उतरतील याबाबत शंका आहे. एकंदरीत या मतदारसंघातील सामाजिक रचना पाहता राष्ट्रवादी काँग्रेस चे संघटन जाडे चांगले आहे परंतु हक्काचा त्यांना माणूस नसल्यामुळे आणि गेल्या पाच वर्षात आमदाराच्या विकासाभिमुख नेतृत्वामुळे एकंदरीत मतांची प्रचंड धुवीकरण राष्ट्रवादीमध्ये होणार असून पक्ष नव्हे तर मंगेश दादा म्हणून अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते या मतदारसंघात त्यांना जोडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला तसं पाहिलं तर दोघेही उमेदवार जवळचे नाहीत परंतु त्यातल्या त्यात आपल्या राजगडाची उमेदवारी कट करण्याचे शल्य त्यांच्या मनात आहे म्हणून दगडापेक्षा वीट मऊ हे मनात ठेवून व काही ठिकाणी बोलून संवाद करून ते वेगळ्या मार्गाला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.