जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात महायुतीचे सर्व उमेदवार घोषित झाले आहेत. महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार सुरेश भोळे दिनांक २८ रोजी उमेदवारी दाखल करणार आहेत. नेते गिरीश महाजन यांची उपस्थिती राहील.
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून इच्छूक उमेदवारांनी अर्ज घेतले असून ठरलेल्या मुहूर्तानुसार अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज दाखल करण्याची प्रक्रीया दिनांक २३ ऑक्टोबरपासून सुरू झाली असून २९ ऑक्टोबरपर्यत अर्ज दाखल करता येणार आहे. भाजपतर्फे २८ रोजी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे.
महायुतीतील भाजप उमेदवारांचे दिनांक २८ रोजी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. नेते गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात येणार आहे. मंडळ अध्यक्षासह सर्व पदाधिकारी अर्ज भरतांना हजर राहणार असल्याचे आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले.