राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून अनेक घडामोडी करीत असतांना कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली पहिली यादी जाहीर केली असून यात जळगाव जिल्ह्यात पाच शिलेदारांना पुन्हा एकदा मैदानात उतरविले आहे. तर दुसरीकडे पाचोरा विधानसभा मतदार संघात आ.किशोर पाटील यांना संधी दिली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी नुकतीच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नेहमीच मनोज जरांगे पाटील आक्रमक भूमिका घेत असून यंदाच्या विधानसभेत देखील मनोज जरांगे पाटील आपले उमेदवार उभे करणार असल्याची माहिती समोर असतांना नुकतेच स्व.आर.ओ.पाटील यांच्या कन्या वैशालीताई सूर्यवंशी गेल्या गेल्या दोन वर्षापासून ठाकरे गटाचे मोठे काम करीत आहे. त्यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याने जळगाव जिल्ह्यातील पाचोरा – भडगाव विधानसभा निवडणुकीचे चित्र बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.