Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मनसेची यादी जाहीर : अनेकांना संधी ; ठाकरे पुत्र मैदानात !
    राजकारण

    मनसेची यादी जाहीर : अनेकांना संधी ; ठाकरे पुत्र मैदानात !

    editor deskBy editor deskOctober 23, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यात निवडणुकीच्या यादीचा कहर सुरु झाला असून नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाकडून उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 45 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव तथा मनसे नेते अमित ठाकरे यांची देखील उमेदवारी जाहीर झाली आहे.

    अमित ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर संदीप देशपांडे यांना वरळीतून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे वरळीत ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे विरुद्ध मनसेचे संदीप देशपांडे यांच्यात काँटे की टक्कर असणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे काल डोंबिवली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार राजू पाटील आणि मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची उमेदवारी जाहीर केली होती. राज ठाकरे यांनी आपल्या 5 मिनिटांच्या भाषणात राजू पाटील यांना कल्याण ग्रामीण आणि अविनाश जाधव यांना ठाणे मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली होती.

    कल्याण ग्रामीणमधूम राजू पाटील, माहीममधून अमित ठाकरे, भांडुप पश्चिम मतदारसंघातून शिरीष सावंत, वरळीतून संदीप देशपांडे, ठाणे शहरमधून अविनाश जाधव, मुरबाड मतदारसंघातून संगिता चेंदवणकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. संगिता चेंदवणकर यांची बदलापूर अत्याचार प्रकरणात लावून धरण्यात निर्णायक भूमिका ठरली होती.

    पुण्यात कोथरुडमधून किशोर शिंदे, हडपसर येथून साईनाथ बाबार, खडकवासलातून मयुरेश वांजळे, मागाठाणे येथून नयन कदम, बोरीवलीत कुणाल माईणकर, दहिसर मतदारसंघातून राजेश येरुणकर, दिंडोशीतून भास्कर परब, वर्सोवा मतदारसंघातून संदेश देसाई, कांदिवली पूर्वेतून महेश फरकासे, गोरेगाव येथून विरेंद्र जाधव, चारकोप दिनेश साळवी, जोगेश्वरी पूर्वेतून भालचंद्र अंबुरे, विक्रोळीत विश्नजित ढोलम, घाटकोपर पश्चिममधून गणेश चुक्कल, घाटकोपर पूर्वेतून संदीप कुलथे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.