लाईव्ह महाराष्ट्र न्युज : एरंडोल प्रतिनिधी 50 खोके एकदम ओके असे ब्रीद वाक्य महाराष्ट्रात गाजले आहे एरंडोल तालुक्यातील फरकांडे फाट्याजवळ पारोळा येथील गद्दाराच्या एका कार्यकर्त्याच्या गाडीत दीड कोटी रुपयांची रोकड मिळून आल्याने खंडबड उडाली आहे.
रात्री उशिरापर्यंत ही रोकड नेमकी कशासाठी आणली होती हा खुलासा होऊ शकला नाही परंतु हे दीड कोटी रुपये पारोळा येथील गद्दाराच्या मुलाच्या जवळच्या कार्यकर्त्याच्या असल्याचे समजते. महसूल विभागाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. राज्यात आज पाच कोटी रुपये कॅश पकडल्याचे उदाहरण समोर असताना जळगाव जिल्ह्यात देखील दीड कोटी रुपये एका गाडीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.