जळगाव : प्रतिनिधी
जळगाव, एरंडोल विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात सामाजिक ध्रुवीकरण होणार असून गद्दाराच्या मुलाने माळी समाज व राजपूत समाजाला प्रचंड नाराज केले आहे. तसेच कासोदा येथे आदिवासी जमीन हडप केली आहे. यामुळे गद्दारच्या मुलाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी धडपड गद्दाराकडून सुरू आहे.
एरंडोल तालुक्यातील सहकाराचे नेतृत्व मुलाच्या उदयासाठी संपवले दहा वर्षात सहकारात एकही नेतृत्व पुढे येऊ दिले नाही याचा राग देखील या तालुक्यातील जनतेच्या मोठ्या प्रमाणात या गद्दारावर आहे. माळी समाजाच्या एका नेत्याला सुमारे चार वर्षे तुरुंगाची हवा खावा लागली ही कुणामुळे हे सर्व सामान्य जनतेला माहिती आहे त्यामुळे माळी समाज प्रचंड नाराज झाला आहे गद्दाराच्या मुलाला त्याची जागा दाखवल्याशिवाय एरंडोल तालुका स्वस्त बसणार नाही असे चित्र निर्माण झाले आहे. तसेच एरंडोल तालुक्यात दोन नंबरचे धंदे देखील मोठ्या प्रमाणात फोफावले आहे याला आशीर्वाद गद्दाराच्या मुलाने दिला असल्याने प्रचंड तरुण पिढी बरबाद होण्याच्या मार्गावर आहे हे ज्येष्ठ लोकांना कळत असून गद्दाराच्या मुलाने किती खोके वाटले तरी जनता भीक घालणार नाही असे चित्र या तालुक्यात आहे.