मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून महायुतीतील भाजपने पहिली यादी जाहीर झाली आहे तर आज सर्वच पक्षाची यादी जाहीर होत आहे. तत्पूर्वी अजित दादांच्या पक्षाने २७ स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.
या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, कृषीमंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महिला व बालविकासमंत्री अदितीताई तटकरे, खासदार नितीन पाटील, सयाजी शिंदे, आमदार अमोल मिटकरी, अल्पसंख्याक नेते जल्लाउद्दीन सैय्यद, युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आमदार इद्रीस नायकवडी, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, महेश शिंदे, श्रीमती राजलक्ष्मी भोसले, श्रीमती सुरेखाताई ठाकरे, उदयकुमार आहेर, शशिकांत तरंगे, वासिम बुर्हाण, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे आदींचा समावेश आहे.