भुसावळ : प्रतिनिधी
पत्नीला शिवीगाळ केल्याचा जाब पत्रकार असलेल्या पतीने विचारल्यानंतर त्याच्यासह चौघांनी मारहाण केली. ही घटना रविवारी रात्री महेश नगरात घडली. याप्रकरणी चौघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील महेश नगर परिसरात पत्रकार विकास चव्हाण यांची पत्नी व संशयित गिरीश पाटील यांची पत्नी सोबत जेवायला गेल्या होत्या. त्यावर गिरीशने जुना वाद उकरून काढला. वादानंतर विकास यांनी पोलिस ठाणे गाठले. मात्र तक्रार न देताच ते परत गेले. त्यावेळी गिरीशसह अन्य तिघांनी विकास चव्हाण, त्यांचे शालक विजय मिस्तरी व त्यांच्यासोबतचे हेमंत लोहार यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. घटनेनंतर आरोपी पसार झाले आहे. त्यांचा शोध सुरु आहे.