Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू
    क्राईम

    वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

    editor deskBy editor deskOctober 21, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी

    तालुक्यातील  पहूरपेठ अंतर्गत असलेल्या ख्वाजा नगरातील पादचाऱ्याला सकाळी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रविवारी पहाटे ५ वाजेच्या दरम्यान घडली आहे. दौलत लोढू कुंभार (५८) असे मयताचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, दौलत कुंभार हे सकाळी बाहेर गेले होते त्यांना येण्यास उशीर झाला परिवाराने त्यांचा तपास घेतला. यादरम्यान जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या कडेला त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या डोक्याला जबर मार बसला होता. अज्ञात वाहनाने धडक देऊन घटनास्थळावरून फरार झाल्याचे दिसून आले. दौलत कुंभार यांचे पहूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. दौलत कुंभार हे मजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह चालवित होते. पश्चात तीन मुले, पत्नी, सुना नातवंडे असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वरणगावात शस्त्रासह संशयित ताब्यात; पोलिसांची धडक मोहीम

    March 16, 2026

    कत्तलीसाठी निर्दयतेने कोंबून नेला जात असलेला गोवंश गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे पकडला; दोन वाहनांसह जनावरे जप्त !

    March 16, 2026

    किरकोळ वादातून राडा : बँक सेल्स ऑफिसरवर कड्याने हल्ला !

    March 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.