Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरधाव ट्रकची महिलेला धडक : महिलेच्या दोन्ही पायांचा चुराडा
    क्राईम

    भरधाव ट्रकची महिलेला धडक : महिलेच्या दोन्ही पायांचा चुराडा

    editor deskBy editor deskOctober 21, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    किराणा साहित्य घेऊन घरी परतत असलेल्या ललिता प्रकाश सोनवणे (४७, रा. तांबापुरा परिसर) यांना भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे या महिलेच्या दोन्ही पायांचा चुराडा होऊन ते निकामी झाले आहेत. या महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. हा अपघात रविवारी (दि. २०) दुपारी इच्छादेवी चौकात झाला. चालक व ट्रक एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पती अपंग व सासू आजारी असल्याने या दोघांचा आधार असलेल्या ललिता सोनवणे या एका सुपर शॉपमध्ये कामाला आहे. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. रविवारी ललिता या किराणा साहित्य घेऊन घरी परतत असताना आकाशवाणी चौकाकडून अजिंठा चौफुलीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने इच्छादेवी चौकातील सर्कलजवळ त्यांना जोरदार धडक दिली. यात ट्रकच्या पुढील चाकाखाली महिलेचे दोन्ही पाय आल्याने त्यांचा अक्षरशः चुराडा होऊन ते निकामी झाले आहेत.

    अपघात झाल्यानंतर महिलेचे नातेवाईक विवेकानंद बागुल व अन्य नागरिकांनी जखमी अवस्थेत महिलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. महिलेच्या पायांची स्थिती पाहता, तिला खासगी रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, घरची आर्थिक स्थिती बिकट असल्याने लाखोंचा खर्च करणे शक्य नसल्याने या महिलेवर ‘जीएमसी’तीलच आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जळगाव तालुका अध्यक्षपदी सुमित पाटील व उपाध्यक्षपदी प्रविण पाटील यांची नियुक्ती

    February 5, 2026

    खळबळजनक : अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळल्याचा संशय !

    February 5, 2026

    दोन दुचाकीची जबर धडक : दोन तरुण जागीच ठार !

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.