Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तलवार घेवून फिरणारा १९ वर्षीय तरुण अटक
    क्राईम

    तलवार घेवून फिरणारा १९ वर्षीय तरुण अटक

    editor deskBy editor deskOctober 20, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    हद्दपारीचे आदेश असताना तलवार घेवून फिरणारा अंकुश मधुकर सुरवाडे (वय १९, रा. गेंदालाल मिल) या संशयिताला शहर पोलिसांनी अटक कली. त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गेंदालाल मिल परिसरात राहणारा अंकुश सुरवाडे याला जिल्हाधिकारी यांनी हद्दपारचे आदेश काढलेले आहेत. असे असताना देखील तो शहरातून लोखंडी तलवार घेऊन परिसरात दहशत माजवीत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली.

    त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार शुक्रवारी कारवाई करत अट्टल गुन्हेगार अंकुश मधुकर सुरवाडे याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून लोखंडी तलवार हस्तगत केली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल पांचाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल किशोर निकुंभ हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खरीप हंगाम २०२६ नियोजन : जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक !

    April 10, 2026

    कौटुंबिक वादातून पतीचा संताप अनावर; पत्नीची चाकूने हत्या !

    April 10, 2026

    खरीप हंगाम २०२६ : जळगाव जिल्ह्यात युरिया खतांची पहिली रेक दाखल

    April 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.