अमळनेर : प्रतिनिधी
विवाहितेला लग्नाचे आमिष देऊन तिचा गर्भपात करून तिच्याच विवाहित बहिणीशी लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एकावर गुन्हा दाखल झाला आहे. रत्नाकर सुभाष पाटील (रा. शिरूड नाका) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला बाहेर गावी राहत होती. तिचे जळगाव येथील एका तरुणाशी प्रेम जमले. यातून दोघांनी लग्न केले होते. काही दिवसांनी भांडण होत असल्याने दोघांनी घटस्फोट घेतला. ही महिला अधूनमधून बहिणीकडे येत होती. तिथे घरमालक असलेल्या रत्नाकर याच्याशी तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले. त्याने तिला नोकरी आणि लग्नाचे आमिष दाखवले. तसेच त्याची आई आजारी असल्याचे कारण सांगून एक लाख रुपये मागितले. या महिलेने त्याला एक लाखाची मदत केली. पैसे परत मागितले असता त्याने परत केले नाहीत.
त्याचवेळी पीडिता गर्भवती होती. रत्नाकरने तिला गर्भपात करायला सांगितले. यानंतरही तो लग्नाचे आश्वासन देत राहिला. मात्र नंतर त्याने पीडितेच्या मोठ्या बहिणीशीच लग्न करून घेतले. ही महिला त्याला जाब विचारायला गेली असता त्याने शिवीगाळ केली. १४ ऑक्टोबर रोजी रत्नाकरने पीडितेस घरातून हाकलून दिले. महिलेच्या फिर्यादीवरून वरील इसमाविरुद्ध अमळनेर पोलिसात बलात्कार व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला