लाईव्ह महाराष्ट्र न्युज : जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांच्या विरुद्ध मोट बांधण्यासाठी औरंगाबाद रोडवरील एका शोरूम वर काल रात्री डिनर डिप्लोमा सी झाले असल्याचे विश्वासनीय सूत्रांकडून समजते.
विशेष म्हणजे या डिनर डिप्लोमशीला प्रतिष्ठित जळगाव शहराचे उद्योजक, माजी मंत्री, जिल्हा बँकेचे संचालक तथा काही राष्ट्रवादी व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आजारपणानंतर डिनर डिप्लोमाशी असे निमित्त या पार्टीचे असले तरी राजकीय चर्चा मात्र जोरात सुरु आहे.राजू मामाच्या विरुद्ध मोट बांधली गेली असल्याचे समजते. विशेष म्हणजे या डिनर डिप्लोमाशीला राजू मामाच्या विरुद्ध जे उमेदवार असणार आहेत ते स्वतः उपस्थित होते.
भाजपामध्ये व जनतेमध्ये राजू मामाचे जोरदार वजन आहे परंतु काहींना हे खटकत असल्याने सर्व एकत्र आले असल्याचे सांगण्यात येत आहे. ही डिनर डिप्लोमसी राजकीय होती परंतु शहराची दिशा या ठिकाणी ठरली गेले असल्याचे सांगण्यात आले. सात शिवाजीनगरचे नेते देखील उपस्थित होते.