जळगाव प्रतिनिधी । जळगावात रिक्षात बसलेल्या प्रवाशी वृध्दाला लुटणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत.
मोसिन खान उर्फ शेमड्या नूरखान पठाण वय-२८, शाहरुख शेख रफीक वय-२० दोघ रा. पिंप्राळा हुडको, समाधान सुमेरसिंग पाटील वय-३३ रा. खंडेराव नगर अशी अटकेतील तिघांची नावे आहेत.
शहरातील तांबापुर परिसरातील शेख जलील शेख ईब्राहीम (वय-७२) हे धुळे जाण्यासाठी आकाशवाणी चौकात वाहनाची वाट पाहत थांबले होते. यावेळी आलेल्या एका रिक्षात शेख जलील बसले. यावेळी रिक्षात पुर्वीच बसलेल्या तीन जणांनी शेख जलील यांच्या खिशातील १५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने काढून घेत त्यांना रस्त्यात उतरवून दिले. याप्रकरणी शेख यांच्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपी मोसिन खान, शाहरुख शेख रफीक, समाधान पाटील या तिघा संशयितांना अटक केली. पुढील कारवाईसाठी तिघांना पुढील कार्यवाहीसाठी रामानंदनगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
वयोवृद्धाला लुटल्याची घटना घडताच पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अकरम शेख, सुधाकर अंभोरे, प्रितम पाटील, राहूल पाटील, नितीन बाविस्कर, अविनाश देवरे, भारत पाटील यांनी कावाई केली.