परंपरा खंडित होणार की अबाधित राहणार
विजय पाटील : जळगाव जिल्ह्यामधील अमळनेर हा विधानसभा क्षेत्र एक वेगळेच रसायन आहे या रसायनामध्ये कधी पक्षाला तर कधी अपक्षाला विजय मिळत असतो या विजयात महत्त्वाची भूमिका निभावतात ते जिल्हा परिषदेचे गट या गटातटाचे राजकारणावर सर्व अंमळनेर विधानसभा क्षेत्राचे राजकारण अवलंबून आहे.
अमळनेर ची विशेष परंपरा असलेले ज्याला एक वेळा आमदारकीची संधी दिली त्याला दुसऱ्यांदा कधीच देत नाही ही परंपरा यावर्षी अबाधित राहणार की खंडित होणार याकडे सर्वांचे उत्सुकतेचे लक्ष लागलेले आहेत. जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाची एकमेव आमदार व नामदार असलेले अनिल भाईदास पाटील यांना पुन्हा जनता संधी देणार की अपक्षाला पुन्हा डोक्यावर घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
अमळनेर ने आज पर्यंत ज्यालाही आमदारकीची संधी दिली त्याला दुसऱ्यांदा कधीच संधी दिलेली नाही भाजपाचे एकमेव आमदार असले त्यानंतर पुन्हा अमळनेरच्या जनतेने नवीन व बहुतांशी अपक्ष उमेदवारांना आमदार बनवलेले आहेत
या कबड्डीच्या मैदानामध्ये यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सर्वात निकटवर्तीय नामदार अनिल भाईदास पाटील यांची सर्व ताकद अमळनेरात लागणार आहेत. मात्र परंपराप्रमाणे पुन्हा अमळनेर ची जनता नामदारांना संधी देणार का त्यांना आव्हान देण्यासाठी माजी आमदार शिरीष चौधरी हे अपक्ष मैदानात उतरत आहे.
अमळनेरच्या मातीतीलं वैशिष्ट्य म्हणजे अपक्ष म्हणून मैदानात उतरतो तो विजयाचे माळ घालत असतो.याचे उदाहरण पाहायचे झाल्यास साहेबराव पाटील शिरीष चौधरी ही आहेत.यावेळेस नामदारांना आपले बालेकिल्लांमध्ये आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तिलोत्तमा पाटील, साहेबराव पाटील श्याम पाटील हे आहेत तर उद्धव बाळासाहेब ठाकरे कडून एडवोकेट ललिता पाटील काँग्रेसकडून संदीप घोरपडे सुलोचना वाघ यांच्या आवाहन आहेत.
राष्ट्रवादी अजित पर गटाची एकमेव विजयी उमेदवार व आमदार असलेले यांना आपली दावेदारी कायम ठेवण्यासाठी खूप अडचणी सामना करावा लागणार आहे ज्यावेळेस त्यांच्यासोबत साहेबराव होते यावेळेस ते मात्र नाही आहे त्यांनी गेल्या वेळेसच आपली नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे अनिल पाटील यांच्या घोडदौड तिथपर्यंत यशस्वी होईल हे अजूनही सांगता येत नाही अमळनेर ही जनता त्यांना पाडळसरे धरणासाठी घोषणा केल्यानंतर किंवा लाडकी बहीण कार्यक्रमाला पावसाने झोडपल्यानंतर त्यांच्या बाजूने उभी राहील का ! पाण्याच्या जोरदार सुरू असतानाही बहिणी भावाची वाट पाहत होते मात्र जळगावला आलेले भाऊ जोरदार पावसामुळे अमळनेर पर्यंत जाऊ शकले नाही का जाऊ शकले नाही हा महत्त्वाचा प्रश्न मात्र भावा बहिणीतील भेट न झाल्यामुळे येथील नामदारांनाच तो कार्यक्रम पार पाडावा लागला. ते अमळनेरात का आले नाही .हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.
अजित पवार गटाचे पाहिजे तसे वर्चस्व हे फक्त अमळनेर पुरते मर्यादित आहे त्यामुळे अमळनेर या ठिकाणी जो भाजपाच्या बालेकिल्ला आहे. तर भाजपाच्या या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नामदार विजय होणार का !
अमळनेर रोजगाराच्या संध्याकाळी तसे उपलब्ध होऊ शकले नाही शेतीसाठी अत्याधुनिक अशी कोणती यंत्रणा किंवा प्रयोगशाळा अमळनेरात उभे राहिले नाही मंगळ ग्रह सखाराम महाराज यांचे गादी साने गुरुजी, प्रताप विद्यालय जगविख्यात उद्योगपती अझीम प्रेमजी यांच्या वडिलांनी अमळनेरात विप्रोची सुरुवात केली होती.
आज जरी ते जगात पसरली असली तरी मात्र अमळनेर मध्ये पाहिजे तसे त्याचे मोठे अस्तित्व नाही ज्या विप्रो मधील लाखो लोकांना नोकऱ्या मिळतात त्याची सुरुवात अमळनेरतून झाली मात्र अमळनेर मधील तरुणांना नोकऱ्यांसाठी बाहेर वणवण भटकावे लागत आहे.