• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धक्कादायक : फुटबॉल कोचचा विजेच्या धक्क्याने मृत्यू !

editor desk by editor desk
October 18, 2024
in क्राईम, जळगाव, भुसावळ
0
धक्कादायक : फुटबॉल कोचचा विजेच्या धक्क्याने मृत्यू !

भुसावळ : प्रतिनिधी

शहरातील रेल्वेच्या नॉर्थ कॉलनीमधील रहिवासी सिद्धार्थ अनिल पवार (वय ३५) हे फुटबॉल कोच खेळाडूंना मैदानावर प्रशिक्षण देत होते. या वेळी विजेचे बटन सुरू करताना विजेचा जबर धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू ओढवल्याची ही धक्कादायक घटना बुधवारी संध्याकाळी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील रेल्वेच्या नॉर्थ कॉलनीतील रहिवासी सिद्धार्थ पवार हे फुटबॉल खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी बुधवारी सायंकाळी मैदानावर गेले होते. सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास वीज पुरवठा सुरु झाल्यानंतर सिद्धार्थ पवार हे तेथील विजेचे बटन सुरू करत होते. याचवेळी त्यांना विजेचा जबर धक्का बसला. त्यानंतर त्यांना शहरातील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषीत केले. या दुर्दैवी घटनेमुळे या भागात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी मृत सिध्दार्थ पवार यांचे काका दिलीप पवार यांनी दिलेल्या माहितीवरून शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस उपनिरीक्षक इक्बाल सय्यद, अब्दुल रज्जाक अब्दुल गनी, विकार शेख यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तर उपनिरीक्षक इक्बाल सय्यद या घटनेचा तपास करत आहेत. दरम्यान, सिद्धार्थ पवार हे फुटबॉल कोच असल्याने त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच बहुसंख्य खेळाडूंनी रुग्णालयात धाव घेतली होती. याप्रकरणाची आरपीएफने ही नोंद केली आहे.

Previous Post

गुरांची अवैध वाहतूक करणारे वाहन धरणगाव पोलिसांनी पकडले

Next Post

मोठी बातमी : ठाकरेंचे १५ उमेदवार ठरले ?

Next Post
मोठी बातमी : ठाकरेंचे १५ उमेदवार ठरले ?

मोठी बातमी : ठाकरेंचे १५ उमेदवार ठरले ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group