धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पिंप्री खु येथून जवळच असलेल्या बोरखेडा येथील तरूणाचा विहिरीत तोल जावून पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी उघडकीला आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सविस्तर माहिती अशी की, बोरखेडा येथील रहिवासी असलेले निळकंठेश्वर हायस्कूल चावलखेडा येथील सेवानिवृत्त शिक्षक के. पी. पाटील यांचा एकुलता एक मुलगा शुभम कांतीलाल पाटील (वय-२८) हा ३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास शेतात पाहणी करण्यासाठी गेला होता . तो नेहमीच आपल्या शेतात पीक पाहणीसाठी फेरफटका मारायला जात असे. परंतु दुपारी ४ वाजेपर्यंत मुलगा घरी न आल्याने घरच्या मंडळीनी शोधाशोध सुरू केली. त्यावेळी शुभम हा विहिरीत पडल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी आक्रोश केला होता. जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले.
परिसरात हळहळ..
शुभम हा अत्यंत सु स्वाभाविक होता. त्याचे वडील हे चावलखेडा येथील हायस्कूलला शिक्षक होते. काही दिवसांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले होते . घटना माहिती पडताच सर्वत्र शोककळा पसरली.