लाईव्ह महाराष्ट्र न्युज : प्रतिनिधी
जळगाव शहराच्या पाठोपाठ भुसावळ चे अमृत चे काम जळगावच्या ठेकेदार कंपनीने घेतले आहे जळगाव शहरात भाजप नेत्यांमुळे काम मिळाले परंतु आमदार राजू मामा भोळे यापासून लांब थांबले याचा फायदा राजू मामा यांना झाला आहे तर दुसरीकडे भुसावळ मध्ये अमृत योजनेमध्ये आमदार साहेब संजय सावकारे यांनी जळगावच्या ठेकेदार कंपनीची बाजू घेतल्यामुळे आणि काम दिरंगाईने झाल्यामुळे भुसावळकर जनतेला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला यामुळे बऱ्याच प्रमाणात नागरिकांमध्ये आमदार सावकारे यांच्या विषयी नाराजी पसरली आहे. भुसावळ आतील अनेक रस्ते खराब झाल्यामुळे त्यांना पुन्हा निधी आणण्यास आमदार अपयशी ठरले यामुळे देखील नाराजीचा सूर जनतेमध्ये आहे. अमृत योजनेचे ठेकेदार कंपनीला पाठीशी घातल्यामुळे हा सर्व खेळ सुरू झाला आहे.
जळगाव शहरात अमृत योजनेच्या ठेकेदाराला वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली हे सर्व करूनही काम मनासारखे झाले नाही आणि जनतेचा रोष कायम राहिला. आम्ही जळगावकर आम्हाला जळगावकरांची हित पाहायचे आहे हे ब्रीद वाक्य घेऊन ठेकेदार कंपनीने काम केले परंतु पूर्णपणे वाट लावल्याचे चित्र निर्माण झाले आहे आजही अनेक ठिकाणी अमृतच्या कामामुळे जनतेला मनस्ताप सहन करावा लागतो आहे हे चित्र आहे.