Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आप राज्यात विधानसभा निवडणूक लढणार नाही !
    राजकारण

    आप राज्यात विधानसभा निवडणूक लढणार नाही !

    editor deskBy editor deskOctober 17, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून राज्यात युती व आघाडीची जोरदार चर्चा सुरु असतांना नुकतेच दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानातून अंग काढून घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. यामुळे विरोधी पक्षांच्या मतांची विभागणी टळून राज्यातील महाविकास आघाडीला मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    आम आदमी पार्टीने हरियाणा विधानसभा निवडणूक स्वबळावर लढली होती. त्याचा थेट फटका काँग्रेसला बसून भाजपचा मोठा फायदा झाला होता. याचे विरोधकांच्या इंडिया आघाडीत तीव्र पडसाद उमटले होते. त्यामुळे आपने महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणुकीत सावध भूमिका घेत या दोन्ही राज्यांतील निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या दोन्ही राज्यांच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी इंडिया आघाडीला पाठिंबा देईल. आपच्या या भूमिकेमुळे विरोधकांच्या मतांची विभागणी टळून त्याचा थेट फटका भाजप पर्यायाने महायुतीला बसण्याची शक्यता आहे.

    यासंबंधीच्या वृत्तानुसार, आपकडून सध्या केवळ दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर लक्ष केंद्रीत केले जात आहे. यासाठी हा पक्ष इंडिया आघाडी मजबूत करण्यासह पक्षसंघटना बळकट करण्यावर भर देत आहे. दुसरीकडे, आपची महाराष्ट्रातील कार्यकारिणी विधानसभा लढवण्याची तयारी करत होती. पण आपने येथील एक-दोन जागांसाठी वाटाघाटी करण्यात वेळ वाया न घालता इंडिया आघाडीला बळ देण्याचा निर्णय घेतला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.