Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चारचाकीचा भीषण अपघात : मंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नी जखमी !
    क्राईम

    चारचाकीचा भीषण अपघात : मंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नी जखमी !

    editor deskBy editor deskOctober 17, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    उरुळीकांचन : वृत्तसंस्था

    राज्यात सर्वत्र राजकीय उलथापालथी होत असतांना एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सोरतापवाडी फाटा (ता. हवेली) येथे राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या कारला अपघात झाल्याची घटना गुरूवारी (दि.१७) पहाटे घडली. मुंडे यांच्या लॅन्ड क्रुझर कारने ट्रॅव्हल्स बसला पाठिमागून जोरदार धडक दिली. या अपघातात राजश्री मुंडे या सुखरुप असून त्या दुसऱ्या वाहनाने पुण्याच्या दिशेने रवाना झाल्या आहेत.

    कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे या आपल्या लॅन्ड क्रुझर कारने पुण्याच्या दिशेने जात होत्या. पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी फाट्याजवळील घुले पेट्रोल पंपासमोरुन जाणाऱ्या ट्रव्हल्स बस गाडीचा अंदाज न आल्याने मुंडे यांची लॅन्ड क्रूझर कार बसला पाठीमागून धडकली. धडक इतकी जोरदार होती की, लॅन्ड क्रुझर कार महामार्ग सोडून रस्त्याच्या बाहेर फेकली गेली. सुदैवाने गाडी पलटी न झाल्याने राजश्री मुंडे व चालक सुखरुप आहेत. त्यानंतर मुंडे या खासगी वाहनाने पुण्याच्या दिशेने निघून गेल्या आहेत. या अपघातात त्या सुखरूप असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.