जळगाव : लाईव्ह महाराष्ट्र न्युज
आम्ही जळगावकर आहोत आम्हाला जळगावचे हित पाहायचे आहे असे मोठे स्वप्न दाखवत ना नफा ना तोटा या तत्त्वावर ठेकेदार कंपनीने जळगाव शहराच्या हितासाठी अमृत योजनेचे काम भाजप नेत्यांना हाताशी धरून घेतले परंतु या या योजनेच्या दिरंगाईमुळे अनेकांचे हातपाय व अनेक जखमी झाले तसेच अनेकांना मनस्ताप करावा लागला याला कुठेतरी शहराचे आमदार राजू मामा भोळे यांनी विरोध केल्यामुळे ठेकेदार कंपनी राजू मामा भोळे यांना तेव्हापासून पाण्यात पाहत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या बिगुल वाजला आहे जळगाव शहरात आमदार राजू मामा भोळे यांच्याविरुद्ध ठेकेदार कंपनीने स्ट्रॉंग उमेदवार देण्याचा अंतर्गत कट रचला आहे. राजू मामा नकोच अशी भूमिका ठेकेदार कंपनीने घेतल्यामुळे जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांची अंतर्गत बाजू भक्कम होत चालले आहे. कारण जनतेला कोण जळगाव करांची हित पहात आहे हे सर्व कळते. 22 महिन्याची मुदत असलेली हे काम पाच वर्ष रेंगाळले गेले याला जबाबदार कोण असा प्रश्न जळगावकरांच्या मनात निर्माण झाला आहे. जळगावकरांची हित तर पाहिलेच नाही उलट जळगावकरांचे शोषण केले या ठेकेदार कंपनीने असे जळगाव शहरातील नागरिकांमध्ये बोलले जात आहे.