जळगाव : प्रतिनिधी
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत तालुक्यातील 55 सिंचन विहिरी आणि 72 गोठ्यांच्या कामांचे कार्यारंभ आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री म्हणाले की, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी आवश्यक असलेल्या सिंचनाच्या सुविधा आणि पशुपालनासाठी गोठे निर्माण करण्यास मदत होणार असून या शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण होईल आणि पाण्याच्या समस्यांवर प्रभावी उपाय होईल. वैयक्तिक सिंचन विहिरींमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतांमध्ये नियमित पाण्याचा पुरवठा करता येईल, ज्यामुळे पीक उत्पादनात वाढ होईल. गोठ्यांमुळे पशुपालन क्षेत्रात सुधारणा होऊन शेतकऱ्यांना पशुधनाची योग्य काळजी घेणे शक्य होणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन दूध संघाचे संचालक रमेश आप्पा पाटील यांनी केले आभार तालुका प्रमुख शिवराज पाटील यांनी मांनले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी तालुका प्रमुख सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, समाधान पवार, शिवराज पाटील, माजी सभापती नंदलाल पाटील, लाडकी बहीण चे अध्यक्ष अर्जुन पाटील, रवी कापडणे, पि.के. पाटील, जितू पाटील, विस्तार अधिकारी एस. डी. दांडगे, राजेश इंगळे, धीरज बढे, कक्ष अधिकारी विवेक अत्तरदे , यांच्यासह लाभार्थी शेतकरी व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.