जळगाव : प्रतिनिधी
कागदोपत्री मोठ्या प्रमाणात कामे मंजुरी दाखवली गेली तसेच प्रशासकीय मान्यता देखील झाल्या निविदा प्रक्रिया राबवली गेली आचारसंहिता लागण्याच्या काही तास अगोदर वर्क ऑर्डर देण्यासाठी पारोळा गद्दाराच्या मुलाने दहा ते पंधरा टक्के टक्केवारी मधून 40 ते 50 सी आर मोकळे केले. भविष्यात या कामांवर किती तरतूद होईल हे काम होईल का नाही ही शंका आहे परंतु ठेकेदारांना आज मात्र करोडो रुपये मोजावे लागले ही शोकांतिका आहे.
पारोळा व एरंडोल मध्ये हजार कोटीचे कामे दाखवली गेली प्रत्यक्षात एक विटही सुरू नाही परंतु ठेकेदारांमार्फत मोठ्या प्रमाणात टक्केवारी घेऊन आपला उल्लू सीधा करण्यात आलेला आहे. गद्दाराच्या मुलाने तर पेट्रोल पंपावर दुकान सुरू केले होते मोठ्या प्रमाणात ठेकेदारांकडून वसुली सुरू झाली आणि शेवटच्या घटकाला वर्क ऑर्डर दिल्या गेल्या. संपूर्ण एरंडोल व पारोळा तालुक्यात मोठा प्रमाणात कोट्यावधी रुपये टक्केवारी घेतल्याची चर्चा सुरू आहे या टक्केवारीच्या जीवावर आता निवडणुका जिंकायला निघाले आहे सर्व सामान्य जनता हे सर्व ओळखून असून एरंडोल पारोळा शहर हे भयमुक्त व गुंडगिरी मुक्त पाहिजे असेल तर या टक्केवारी वाल्यांना घरी बसवण्याची वेळ आली आहे. नाहीतर खूपच वेदना सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागतील. जागृत व्हा हीच वेळ आहे. आता सर्वसामान्य नागरिकांमध्ये बोलण्यात येत आहे.