लाईव्ह महाराष्ट्र : जळगाव
शहरासाठी शाप की वरदान ठरलेल्या अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण आचारसंहिता लागण्याच्या काही मिनिटाच्या अगोदर भाजप नेत्यांच्या हस्ते झाले. एवढ्या घाईत कशासाठी लोकार्पण झाले हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे. जी योजना वर्षानुवर्षे सुरू होते आणि अनेकांच्या या खड्ड्यांमुळे घरात कुणाचे कंबर्डे, कोणाचा पाय मोडला कोण जखमी झालं अशी परिस्थिती जळगावकरांनी सहन केली. या अमृत मुळे भाजपा बदनाम झाली तरी सुद्धा भाजपनेत्यांनी एवढी घाई शुभारंभ साठी कशासाठी केली हे कळत नाही.
जळगाव शहरात 85000 घरांमध्ये चांगल्या पद्धतीने अमृतचे पाणी सुरू झाले आहे पण या अमृतमुळे जळगावकरांची कशी वाट लागली हे जळगावकर कसे विसरणार. जळगाव खड्डेमय झाले मुदतीत काम झाले नाही तरीसुद्धा ठेकेदाराला राजकीय राजश्री दिला गेला याला जबाबदार कोण. किरकोळ ठेकेदार राहिला असता तर त्याच्यावर कारवाई झाली असती पण एवढे वर्ष दिरंगाई करूनही योजना कितपत टिकाऊ धरते हा प्रश्नचिन्ह सर्वसामान्य माणसांच्या मनात कायम आहे.
खड्डेमय जळगाव म्हणून या जळगावची ओळख झाली अमृत वर्षानुवर्षे चालले तीच अवस्था भुसावळ ची सुरू आहे. भुसावळच्या अमृतमुळे आमदार संजय सावकारे यांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असो महापालिका अधिकाऱ्यांनी कशासाठी घाई केली तसेच यामागे काय गोड बंगाल आहे सरकार तर बदलणार नाही ना असा देखील प्रश्न उपस्थित झाल्यामुळे घाईघाईत लोकार्पण करून कागदी व्यवहार क्लिअर केला गेला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.