जळगाव : प्रतिनिधी
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून नफ्याचे आमिष दाखवीत सोनल भीमराव उपलपवार या सायबर जनजागृती करणाऱ्या प्राध्यापिकेची एक कोटी पाच लाख २३ हजार ३४१ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात हरयाणा व मुंबई येथून चारजणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ११ लाख १० हजार रुपये हस्तगत केले असून, ते जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते तक्रारदार महिलेला देण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव सायबर पोलिसांनी मुकेश सुभाष (वय २६), अंकुश सतपाल (२९, दोघे रा. नादोरी, जि. फतेहाबाद, हरयाणा) या दोघांना हरयाणातून, तर दीपांकर गौतम राजेंद्र (२९, रा. भायखळा पश्चिम), नूरमोहम्मद अब्दुल रशिद बगे (२४, रा. नागपाडा, मुंबई) या दोघांना मुंबई येथून अटक केले. त्यांच्याकडून ११ लाख १० हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे.