प्रतिनिधी लाईव्ह महाराष्ट्र न्यूज प्रविण पाटील। तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथील प्राथमिक शाळेत पहिले ते चौथीच्या वर्गासाठी तीन शिक्षक मंजूर आहे. परंतू प्रत्यक्षात एका शिक्षकावर ८८ विद्यार्थ्यांची शाळा चालविली जात असल्याने विद्यार्थ्यांच शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षक मिळेल का शिक्षक ! अशी अवस्था येथील शाळेची झाली आहे.
एकीकडे शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रगती होत आहे. त्याच डिजीटलचे शिक्षण देण्यावर अधिक भर दिला जात आहे. असे असतांना दुसरी कडे जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे अनेक शाळांमध्ये मोजक्या कमी शिक्षकांवर चालविली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. जळगाव तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथील प्राथमिक शाळेत एकुण पहिली ते चौथी असे चार वर्ग आहे. चार वर्गांसाठी शासनाने तीन शिक्षकांनी मंजूरी दिली आहे. मुख्याध्यापकासह एक शिक्षक असे एकुण दोन जणांवर हा भार होता. त्यातच मुख्याध्यापक हे सेवानिवृत्त झाल्याने आता प्रत्यक्षात एकच शिक्षक हा चारही वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. चार वर्ग मिळून एकुण ८८ विद्यार्थी आहेत. मुळात एका शिक्षकावर आलेला ताण आणि यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा मोठा परिणाम दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी जिल्हा परिषदेने उर्वरित दोन शिक्षकांची नियुक्ती तातडीने करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केले आहे. वेळीच दखल न घेतल्यास वसंतवाडी तांडा येथील ग्रामस्थ रस्त्यावर उतरतील असा इशारा देण्यात आला आहे.