Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रेल्वे स्थानकावर आढळले एक पिस्तूल आणि ९ जिवंत काडतुसे
    क्राईम

    रेल्वे स्थानकावर आढळले एक पिस्तूल आणि ९ जिवंत काडतुसे

    editor deskBy editor deskOctober 15, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    रेल्वे सुरक्षा बलासह लोहमार्ग पोलिसांनी संयुक्त कारवाई करत प्रकाश आकाश मुंडे (वय ३१, रा. परळी, जि. बीड) याला अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि ९ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ रेल्वे स्थानकावरील दक्षिणेच्या बाजूला बॅगची तपासणी करत असताना स्कॅनर मशीनमध्ये पिस्तूल आढळले. पोलिसांनी या बॅगेची तपासणी केली असता, त्यात एक गावठी पिस्तूल व ९ जिवंत काडतुसे आढळली.

    रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक पी. आर. मीना व लोहमार्गचे पोलिस निरीक्षक सुधीर धायरकर यांनी घटनास्थळी भेट दिली. रात्री उशिरा संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयिताकडे पुणे प्रवासाचे जनरल तिकीट आढळले. काही दिवसांपूर्वीच लगेज स्कॅनरमध्ये तपासणीदरम्यान गांजा आढळला होता व त्यानंतर आता पिस्तूल आढळल्याने खळबळ उडाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विद्यार्थी-शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी भाजपला रामराम! अमळनेरचे श्याम पाटील यांचा सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

    July 26, 2026

    संसाराच्या उंबरठ्यावर रक्ताचे डाग; दारूच्या पैशावरून पत्नीचा दुर्दैवी अंत

    July 26, 2026

    कामावरून घरी परतताना काळाचा घाला; जळगावात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    July 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.