जळगाव : प्रतिनिधी
फोनवर बोलणे करुन व दिल्याचा राग आल्याने टोळक्याने प्रौढासह त्याच्या मुलाला बेदम मारहाण केली. तसेच कोणत्यातरी हत्याराने वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना दि. १० ऑक्टोंबर रोजी सायंकाळी जळगाव तालुक्यातील धानवड येथे घडली. याप्रकरणी ९ जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील धानवड तांडा येथील पोपट उखा राठोड (वय ४०) हे वास्तव्यास आहे. दि. १० रोजी सायंकाळी ते घरी असतांना गावातील गोरख धनसिंग चव्हाण व मिथून मकराम चव्हाण यांनी त्यांच्या मुलाच्या फोनवरुन कॉल करुन त्यांना शिरसोली रस्त्याकडे बोलावले. त्याठिकाणी गेल्यानंतर त्यांनी फोन केल्यानंतर तु रविंद्र ईश्वर राठोड याच्यासोबत बोलणे का करुन दिले नाही. या कारणावरुन त्यांनी त्यांचा मुलगा पवन राठोड याला मारहाण करण्यास सुरुवात केली. पवन याने फोन करीत मला मारहाण करीत असल्याचे सांगितल्यानंतर त्यांचा भावाचा मुलगा उमेश प्रभाकर राठोड हा भांडण आवरण्यासाठी गेला.
त्यावेळी गोरख चव्हाण याने त्याच्याजवळील हत्याराने पोपट राठोड याच्या हातावर वार करुन गंभीर जखमी केले. तसेच मुन्ना दिलीप चव्हाण याने डौयावर आणि हातावर मारहाण करुन गंभीर दुखापत केली. तसेच त्यांच्या भावाचा मुलगा उमेश राठोड याच्या डोयावर गोरख चव्हाण याने काठीने मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी पोपट राठोड यांनी दिलेल्या – तक्रारीवरुन संशयित गोरख धारासिंग चव्हाण, मुन्ना दिलीप चव्हाण, मिथून चव्हाण, शिवराम आलम चव्हाण, शेखर धारासिंग चिव्हाण, भगा धारासिंग चव्हाण, दिलीप चव्हाण, सुनिल दिलीप चव्हाण, फौजदार जालम चव्हाण सर्व रा. धानवड, तांडा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गफूर तडवी हे करीत आहे.