जळगाव : प्रतिनिधी
तालक्यातील म्हसावद येथील इंदिरा नगर मधील रहीवाशी असलेले रफीक शेख भैय्या व त्यांची पत्नी फिरोजाबी शेख रफीक हे आपल्या दोन मुलांसह वास्तव्यास आहेत रविवार दिनांक १३ ऑक्टोबर दुपारी दोन च्या सुमारास त्यांची दोन्ही मुले अनुक्रमे नवाज रफीक शेख वय वर्षे १२ आणि हसनैन रफीक शेख हे गावातील दुर्गा विसर्जन पाहण्यासाठी गिरणानदीवर गेले असतांना हसनैन शेख याचा पाय घसरून तो नदीपात्रात पडला.
हे त्यांच्या सोबत असलेल्या त्याचा भाऊ नवाज शेख याने पाहीले व त्याने भावाला बाहेर काढण्यासाठी पाण्यात उडी घेतली परंतु दोन्ही पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्याठिकाणी नागरीकांना मधुन हुसेन शहा या तरुणाने क्षणात नदीत उडी घेऊन नवाज शेख हा बालकाचे प्राण वाचवले मात्र तोपर्यंत हसनैन हा पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पाण्यात बुडाला या ठिकाणी असणाऱ्या मच्छीमार बांधवांनी अथक परिश्रम करून सायंकाळी चार च्या सुमारास हसनैन याचा मृतदेह आढळला ते बघुन घरच्यांनी हंबरडा फोडला.
घटनास्थळावर उपस्थित औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनचे पोलीस हे.कॉ.स्वप्नील पाटील यांनी बालकाचा मृतदेह शवच्छेदनासाठी जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.हसनैन या बालकांच्या पाण्यात बुडवून मयत झालेच वृत्त गावात सर्वत्र पसरले