Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नाचण्याचे कारण आणि जुन्या वादाची किनार; बांभोरीत तरूणावर चाकूने वार अन् उपचारादरम्यान मृत्यू
    क्राईम

    नाचण्याचे कारण आणि जुन्या वादाची किनार; बांभोरीत तरूणावर चाकूने वार अन् उपचारादरम्यान मृत्यू

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रFebruary 2, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । तालुक्यातील बांभोरी येथे हळदीच्या कार्यक्रमात नाचण्याच्या कारण आणि जुन्या वादाची किनार यातून झालेल्या चाकू भोसकून तरूणाला गंभीर जखमी केले. जखमी झालेल्या अतुल विजय कोळी (नन्नवरे) (वय-२५) या तरूणाचा आज पहाटे मृत्यू झालाय. या गुन्ह्यातील चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

    सविस्तर माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील नितीन साहेबराव बाविस्कर याच्या लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात नाचण्याच्या कारणावरून जुन्या वादाची किनार यातून धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील अतुल विजय कोळी (नन्नवरे) (वय-२५) या तरूणावर गावातील अजय विनोद नन्नवरे रा. बांभोरी ता. धरणगाव याने पोटात चाकू भोसकून गंभीर रित्या जखमी केल्याची घटना २७ जानेवारी रोजी मध्यरात्री घडली होती. जखमी झालेल्या अतुल नन्नवरे याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी संशयित आरोपी अजय विनोद नन्नवरे, विजय विनोद नन्नवरे, संदीप घमा नन्नवरे आणि ज्ञानेश्वर भावलाल नन्नवरे सर्व रा. बांभोरी ता. धरणगाव यांना अटक केली होती. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, जखमी अतुल नन्नवरे हा जळगाव जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार घेत असतांना बुधवारी २ फेब्रुवारी रोजी सकाळी ३ वाजता मृत्यू झाला आहे. मयतच्या पश्चात आई अन्नपुर्णाबाई, वडील विजय बाबुराव नन्नवरे आणि मोठा भाऊ राहूल नन्नवरे असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.