जळगाव : प्रतिनिधी
वधू वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून योग्य स्थळ शोधण्यात मदत होते. योग्य स्थळासाठी बाहेर फिरण्यासाठी लागणारा पैसा, वेळ, श्रम कमी होतात असे प्रतिपादन शहराचे आ. राजूमामा भोळे यांनी व्यक्त केले.
“लेवा शुभमंगल” तर्फे आयोजित सकल लेवा पाटीदार समाज आयोजीत वधू वर परिचय मेळावा आज रविवारी दि. ६ ऑक्टोबर रोजी एका हॉटेलमध्ये पार पडला. यावेळी समाजाचे कुटुंबनायक ललित पटिल, उद्योजक अरुण बोरोले, डॉ. प्रमोद महाजन, डॉ. अमित भंगाळे, डी. के. देशमुख, व्ही. एच. पाटील व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी लेवा शुभमंगल डिरेक्टरीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर विवाहेच्छुक वधू वरानी त्यांचा परिचय करून दिला.
यावेळी आ. राजूमामा भोळे म्हणाले, लेवा पाटीदार समाज प्रगत झालेला आहे. “लेवा शुभमंगल”च्या माध्यमातून वधू वरांना आयुष्याचा जोडीदार निवडण्यासाठी आज मेळाव्याच्या माध्यमातून चांगले व्यासपीठ मिळाले आहे. तरुणांनी पूर्ण चर्चा करून आपला जोडीदार निवडावा व विवाहबंधनात अडकावे असा सल्ला आ. राजूमामा भोळे यांनी दिला आहे.