जळगाव : प्रतिनिधी
गॅसवर खाद्य पदार्थ गरम करीत असताना गॅस रेग्युलेटर लिकेज होऊन आग लागल्याने अनंत भिमराव ठाकूर (रा. विठ्ठलवाडी, खोटे नगर) यांच्या घरातील साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने वेळीच आग नियंत्रणात आल्याने सिलिंडर फुटले नाही की इतर कोणाला दुखापत झाली नाही. मात्र दसरा एक दिवसावर आलेला असताना किराणा साहित्यासह इतरही वस्तू जळून खाक झाल्या.
शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास खाद्य पदार्थ गरम करण्यासाठी ठाकूर यांच्या घरातील मंडळींनी गॅस सुरू केला. त्या वेळी रेग्युलेटर लिकेज झाले व पेट घेतला. यामुळे सर्व जण भयभीत झाले. त्या वेळी ठाकूर यांच्या वडिलांनी चादर ओली करून ती रेग्युलेटरवर टाकली. या विषयी अग्नीशमन दलाला माहिती – मिळाल्यानंतर एक बंब दाखल झाला व कर्मचारी देविदास सुरवाडे, रोहिदास चौधरी, जगदीश साळुंखे, इकबाल तडवी, महेश पाटील यांनी आग विझवली