Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शिवाजी नगरातील तरूणीची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट
    क्राईम

    शिवाजी नगरातील तरूणीची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रFebruary 2, 2022Updated:February 2, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । शिवाजी नगरातील भारत नगर येथील कोमल ज्ञानेश्वर कांबळे (वय-२०) रा. भारत नगर, शिवाजी नगर परिसर जळगाव या तरूणीने राहत्या घरात ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीला आली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


    याबाबत माहिती अशी की, कोमल कांबळे ती युवती आपल्या आई, वडील व दोन भावांसह वास्तव्याला आहे. वडील खासगी लक्झरी चालवून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. बुधवारी २ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घरी कुणीही नसतांना कोमल हिने राहत्या घरात ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार शेजारी राहणाऱ्या एका मुलीच्या लक्षात आल्याने घटना उघडकीला आली. युवतीने आत्महत्या का केली याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. घटनेची माहिती मिळाताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेवून पंचनामा केला व मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला. डॉ. रेणुका भंगाळे यांच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा प्राथमिक तपास पोहेका संजय झाल्टे आणि महिला पोलीस कर्मचारी रेश्मा मालवणकर हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.