Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्ह्यातील जि.प.च्या शाळेत ५ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
    क्राईम

    जिल्ह्यातील जि.प.च्या शाळेत ५ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

    editor deskBy editor deskOctober 10, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा : प्रतिनिधी

    तालुक्यातील गजानन पळासखेडे येथील जि.प.च्या शाळेत ५ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील गजानन पळासखेडे येथील जि. प. शाळेत शिक्षण घेणाऱ्या ५ विद्यार्थ्यांना बुधवारी अन्नातून विषबाधा झाली. पारोळा कुटीर रुग्णालयात त्यांच्यावर वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत रनाळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. जिनेंद्र पाटील, कर्मचारी समाधान पाटील, राजू वानखेडे, परिचारिका बोरसे यांनी उपचार केले. घटनास्थळी वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत सूर्यवंशी, गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील. प्रभारी केंद्रप्रमुख संजय राजपूत आदींनी भेट दिली. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या पालकांनी कुटीर रुग्णालयात धाव घेत गर्दी केली होती. डॉक्टरांची सर्व टीम घटनास्थळी दाखल झाली होती. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ली, त्या सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी या टीमने केली. शेळावे आरोग्य केंद्रातील डॉक्टरसह इतर डॉक्टरही उपस्थित होते.

    शाळेतील ओम प्रदीप पवार (१२), दिव्या चेतन पाटील (१२), लावण्या गणेश पाटील (१२), लक्ष्मी अतुल मराठे (१२) व ज्योती संजय ठाकरे (१४) या विद्यार्थ्यांनी दुपारी खिचडीचे जेवण केल्यानंतर काही तासाने अचानक चक्कर, मळमळ, उलट्या असा प्रकार जाणवू लागला. त्यांना तत्काळ पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले,

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भारत-अमेरिका व्यापार करारावरून काँग्रेस आक्रमक; शेतकरी संघर्ष पदयात्रा

    March 9, 2026

    “तू इकडे का आला?” वादातून कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    March 9, 2026

    आर्थीक त्रासाला कंटाळून हॉटेल व्यावसायीकाने घेतला टोकाचा निर्णय : सुसाईट नोट व्हायरल !

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.