• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आ.मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांनी महापुरुषांच्या विचारांचा जोगवा,

चाळीसगाव तालुक्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन व इतर अनुषंगिक कामांसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर .

editor desk by editor desk
October 9, 2024
in चाळीसगाव, जळगाव, राजकारण
0
आ.मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांनी महापुरुषांच्या विचारांचा जोगवा,

चाळीसगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी चाळीसगाव तालुक्यात महापुरुषांचे विचार व त्यांचे कार्य याचा जोगवा करण्याचा चंग बांधला आहे. त्यातूनच तालुक्यात महापुरुषांचे स्मारके, त्यांच्या नावाने, चौक, रस्ते , सभामंडप, सभागृहे उभी राहिली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक, महाराणा प्रताप चौक, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सभागृह, अहिल्यादेवी  सभागृह, संत सावता सभागृह, वीर एकलव्य भवन, संत सेवालाल भवन या महापुरुषांना बरोबरच तालुक्यातील शहीद जवानांचे स्मारक उभारण्यात आले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने देखील तालुक्यातील 14 ठिकाणी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन उभारले जाणार आहे. सदर सामाजिक भवन व इतर कामांसाठी शासनाने नुकत्याच रुपये 5 कोटी रुपयांचा निधी मंजुरी दिली आहे. त्यामुळे सामाजिक भवनातून आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता,न्याय, बंधुता या विचारांच्या शिकवणीचा जोगवा या निमित्ताने होणार आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच चाळीसगाव येथे महाराणा प्रताप यांच्या नावाने उभारलेल्या भव्य चौकाचे लोकार्पण करण्यात आले, त्यानंतर महात्मा ज्तोतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी 2 कोटी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन आदी कामांसाठी ५ कोटी असा भरघोस निधी उपलब्ध केला आहे.
“भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सामाजिक न्याय भवन उभारण्यासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करत होतो, लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या सामाजिक विकास निधीतून 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. बाबासाहेबांचे विचार कायम तेवत ठेवण्यासाठी हे सामाजिक भवन प्रेरणास्थान बनतील, भरघोस असा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन यांचे आभार मानतो” :- आमदार मंगेश दादा चव्हाण 
 मंजूर झालेल्या कामांची नावे व झालेले निधी खालील प्रमाणे. 
1) चाळीसगाव शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन निर्माण करणे 1 कोटी 20 लक्ष
2) चाळीसगाव शहरात चौक सुशोभिकरण करणे 50 लक्ष
3) चिंचखेडे येथे संविधान सभागृह भवन बांधकाम करणे 10 लक्ष
4) हातले येथे दलित वस्तीत सभामंडप बांधकाम करणे 20 लक्ष
5) लोंजे येथे दलित वस्ती मध्ये संविधान भवन इमारत बांधकाम करणे 20 लक्ष
6) दस्केबर्डी येथे नवीन बौद्ध समाज मंदिर बांधकाम करणे 15 लक्ष
7) रामनगर दलित वस्ती रस्ता कॉक्रींटीकरण करणे 15 लक्ष
8) सायगाव येथे दलित वस्ती चौक सुशोभीकरण करणे 10 लक्ष
9) शिरसगाव येथे दलित वस्ती रस्ता सुधारणा करणे 10 लक्ष
10) खडकी बु, येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन बांधकाम करणे 50 लक्ष
11) अलवाडी येथे बुद्ध विहार बांधकाम करणे 30 लक्ष
12) पिंप्री बु. प्र.दे. येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन बांधकाम करणे 15 लक्ष
13) वडगाव लांबे येथे महर्षी वाल्मिकी भवन बांधकाम करणे 10 लक्ष
14) वडगाव लांबे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन बांधकाम करणे 10 लक्ष
15) टाकळी प्र.चा. येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह बांधकाम करणे 30 लक्ष
16) कुंझर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह बांधकाम करणे 20 लक्ष
17) रांजणगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह बांधकाम करणे 20 लक्ष
18) देवळी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या लगतच्या नदीस संरक्षक भिंत बांधकाम व अनुषंगिक कामे करणे 20 लक्ष
19) पिंपळगाव येथे रस्ता कॉक्रींटीकरण करणे 15 लक्ष
20) पिंपळवाड निकुंभ येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन बांधकाम करणे 20 लक्ष
एकूण 500 लक्ष
Previous Post

महिलेचा थेट व्यासपीठावरून सवाल : मी सावत्र बहीण आहे का ?

Next Post

हे तिन्ही पक्ष आता हम तुम्हारे है कौन ; फडणवीस !

Next Post
हे तिन्ही पक्ष आता हम तुम्हारे है कौन ; फडणवीस !

हे तिन्ही पक्ष आता हम तुम्हारे है कौन ; फडणवीस !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group