राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांची जोरदार फिल्डिंग लावणे सुरु असतांना नुकतेच परळी मतदार संघातातील राजकारण तापले आहे. राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतेच विरोधकावर टीकास्त्र सोडले आहे.
मंत्री मुंडे म्हणाले कि, ‘मुझे गिराने के लिए कई बडे लोग बार बार गिरे, मगर ये मुमकिन नही है’, मला टार्गेट करण्याचा अनेक जणांनी प्रयत्न केला आहे. ज्या नेत्यांचा आम्ही आजही आदर करतो, त्या नेत्यांनी ही पातळी गाठल्याचे वाईट वाटते, अशा शब्दात त्यांनी नाव न घेता शरदपवारांवर परळीत टीका केली.
परळीत दिव्यांग कल्याणविभागाचे उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडेयांच्यातर्फे, परळी विधानसभा मतदारसंघातील एक हजार कर्णबधीरदिव्यांग बांधवांना, अद्ययावत मशीनवाटप कार्यक्रम सोमवारी झाला.त्यावेळी मंत्री मुंडे बोलत होते. पुढेबोलताना ते म्हणाले की, आम्हीज्यांचा आजही आदर करतो, त्यांनाआदरयुक्त बोलतो. भलेही आम्हीदादांसोबत राहिलो, परंतु कधीहीव्यक्तिगत टीका आम्ही त्यांच्यावरकेली नाही. मात्र माझे घर, माझी जातयावर एवढ्या मोठ्या नेत्याला टीकाकरावी लागते, याची खंत आहेअसेही मुंडे म्हणाले. परळी वैजनाथमतदारसंघातील मायबाप जनता सूज्ञआहे. त्यांना माहीत असते कीआपल्या माणसाला का टार्गेट केलेजात आहे? कुणी टार्गेट करायचाप्रयत्न केला तर त्यांचा टार्गेट कसेहाणून पाडायचे हे सुद्धा परळीकरांनाफार चांगले माहीत आहे, असे म्हणतमंत्री मुंडे यांनी नाव न घेता शरद पवारयांना इशारा दिला.
परळी मतदार संघात आगामीविधानसभा निवडणुकीत शरद पवारगटाकडून, धनंजय मुंडे यांना टार्गेटकरण्यासाठी जोरदार हालचाली सुरूआहेत. परळीत मुंडे विरोधकांची मोटबांधण्याची तयारी पवार गटाकडूनकेली जात आहे.