आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा
मुंबई वृत्तसंस्था । गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ओबीसी आरक्षणाच्या विधेयकावर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.
त्यानंतर आता महाविकास आघाडीतील मंत्री छगन भुजबळ, मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यपाल कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आता महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यात समझोता झाल्याचे दिसून येत आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवा यांनी सांगितले की, राज्यपालांनी सही केली आहे. लॉ सेक्रेटरी यांना त्यांच्याकडे पाठवले होते. भुजबळांनीही त्यांची भेट घेतली. त्यांनाही वेळ दिली. राज्यपालांना सर्व लक्षात आणून देण्यात आलं. या अध्यादेशावर तुम्ही सही केली आहे. याचं बिलात रुपांतर करत असताना दोन्ही बाजूच्या सदस्यांनी एकमताने बिल मंजूर केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रकारणात कोणत्याही प्रकारचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलं नाही. त्यामुळे ओबीसी हा मोठा घटक आहे. त्यांना प्रतिनिधीत्व मिळावं यासाठी प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रातील वातावरण चांगलं राहावं असा प्रयत्न होता. ४ वाजता सेक्रेटरी राज्यपालांकडे गेले. त्यांना सर्व लक्षात आणून दिलं. राज्यपालांनी सही केली. त्यामुळे त्यांचे आभार मानतो. सर्व पक्षीयांनी तयार केलेल्या बिलावर राज्यपालांनी सही केली ही आनंदाची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.