Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » उद्योग राहू द्या महाराष्ट्राला…!तुम्ही जा गुजरातला…!
    जळगाव

    उद्योग राहू द्या महाराष्ट्राला…!तुम्ही जा गुजरातला…!

    editor deskBy editor deskOctober 8, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    दिनांक ७/१०/२०२४ रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षातर्फे आंदोलन व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.सातत्याने महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला हलवण्यात येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी तरुणांचा हातातील हक्काचा रोजगार कमी होत चालला आहे प्रचंड बेरोजगारी वाढत चालली आहे. त्यामुळे मराठी तरुण बेरोजगारीने त्रस्त झाला आहे. त्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षातर्फे महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेणाऱ्या खोके सरकार विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले आहे.

    गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्र राज्यात खोके सरकार स्थापन झाल्यापासून सरकारच्या दुर्लक्षित कारभाराने वेदांता फस्कॉन, टाटा एअर बस प्रकल्प, कोकण पाणबुडी प्रकल्प,मुंबई स्थित हिरे उद्योग, महेंद्र यासारखे अनेक नामवंत प्रकल्प महाराष्ट्र राज्यात होऊ घातलेले अनेक प्रकल्प व वर्षानुवर्ष कार्य गणित असलेले उद्योगधंदे बंद करून गुजरातला स्थलांतरित होत असल्याने या प्रकल्प काम करीत असलेले अनेक कुशल कामगार व अधिकारी बेरोजगार झाले आहेत तसेच. नवीन मजूर प्रकल्प येथे सुरू झाले असते तर अनेक तरुणांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे नोकऱ्या उपलब्ध झाल्या असत्या पण देशाचे पंतप्रधान व सहकारी मंत्री गुजरात राज्याचे असलेले मोदी व शहा यांच्या राज्याकडे म्हणजे गुजरात कडे अनेक उद्योग धंदे नवीन कारखाने महाराष्ट्रात राज्यातून पाळवित आहे परंतु येथील महायुतीचे सरकार हे त्यांचे गुलाम असल्यागत वागत आहेत त्यांच्या या अशा निर्णयाने महाराष्ट्रातील तरुण बेरोजगार होत असून रोजगार नसल्याने व वर्षानुवर्ष सुरू असलेले उद्योग स्थलांतरित होत असल्याने त्रस्त झाले असून अशा निर्णयाने हक्काचा रोजगार या शासनाने चुकीच्या निर्णयाने गमवावा लागत आहे.

    १. होश में आवो होश आवो खोके सरकार होश में आवो..!
    २. रोजगार आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा..!
    ३. खोके मिळतात म्हणून रोजगार पळवतात..!
    ५. गुजरातला उद्योग पळवणाऱ्या खोके सरकारचा जाहीर निषेध असो.!
    ६. रोजगार द्या नाही तर खुर्च्या खाली करा.!
    ७. खोके सरकार हटवा..!
    नोकऱ्या वाचवा..!
    ८. रोजगार आमच्या हक्काचा.. नाही कोणाच्या बापाचा..!
    ९. सरकार हटावा..नोकऱ्या वाचवा..!
    अशा विविध घोषणा आंदोलना वेळी करण्यात आल्या.

    सदर आंदोलन हे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील व जळगाव महानगर अध्यक्ष रिकु चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. सदर आंदोलनात. राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस रमेश पाटील,अरुण लक्ष्मण पाटील संचालक उत्पन्न बाजार समिती,साहिल पटेल, चेतन पवार,आकाश हिवाळे,पंकज राजाराम तनपुरे,शांताराम ठाकूर,शिवराम बारी,प्रमोद सावळे,भूषण आनंदा पाटील,गोलू पवार,अमोल पाटील,हितेश जावळे,मतीन सय्यद व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दक्षता पेट्रोलपंप घोटाळा : उपनिरीक्षक वाघांकडून मुलाच्या खात्यात 10 लाख; सोन्याची खरेदी उघड

    March 11, 2026

    चार वर्षीय चिमुकलीवर मामाने केला अत्याचार : संतप्त जमावाने रोखला महामार्ग !

    March 11, 2026

    जळगावातील हॉटेलात अत्याचार करीत केला गर्भपात !

    March 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.