जळगाव प्रतिनिधी । शहरातील प्रभाग क्रमाक १२ मधील रोटरी भवन मायादेवी नगर येथे कचरा मुक्त कॉलनी या उपक्रमांतर्गत जळगाव शहर नगरपालिकेच्यावतीने नागरीकांचा सत्कार करण्यात आला
याप्रसंगी महापौर जयश्री महाजन यांच्या निर्देशानुसार परिसरातील २८ कॉलनी कचरामुक्त घोषित करण्यात आल्यात. त्या अनुषंगाने कार्यक्रमात नागरीकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जयश्री महाजन महापौर, नगरसेविका ज्वला बेंडाळे, गायत्री राणे, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे सचिव विनोद बियाणी, उपायुक्त शाम गोसावी, रोटरी वेस्टचे पदाधिकारी शहर समन्वयक महेंद्र पवार, आरोग्य निरीक्षक उल्हास इंगळे, प्रमुख केतन हातागळे व मनपाचे कर्मचारी उपस्थित होते.