Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महामार्गावर चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार !
    क्राईम

    महामार्गावर चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार !

    editor deskBy editor deskOctober 7, 2024Updated:October 7, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, रविवारी (६ ऑक्टोबर) पुन्हा भरधाव चारचाकीने दुचाकीला धडक दिल्यामुळे दीपक कडू सूर्यवंशी (४५, रा. नशिराबाद) हे ठार झाले. हा अपघात रविवारी दुपारी नशिराबाद ते भुसावळ दरम्यान वैद्यकीय महाविद्यालयाजवळील उड्डाणपुलावर झाला. द्वारदर्शनाहून परतत असताना सूर्यवंशी यांच्यावर काळाने झडप घातली.

    मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद येथील दीपक सूर्यवंशी हे गावातीलच एका मेडिकलवर कामाला होते. त्यांच्या नातेवाइकांचे निधन झाल्याने ते सासऱ्यांसह ऐनपूर, ता. रावेर येथे द्वारदर्शनासाठी गेले होते तेथे सासऱ्यांना सोडून ते दुचाकीने (एमएच १९, एएम १६६६) घरी परतत असताना नशिराबादजवळ भरधाव चारचाकी वाहनाने धडक दिली. त्यात सूर्यवंशी यांच्या डोक्याला जबर मार लागून ते जागीच ठार झाले. मयताच्या पश्चात पत्नी तसेच सुकांक्षा व दिव्या या दोन मुली असून, या अपघाताने दोन्ही मुलींचे पितृछत्र हिरावले आहे. मनमिळाऊ स्वभाव व सर्वांशी आपुलकीने बोलणारे म्हणून दीपक हे परिचित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खळबळजनक : प्रेम प्रकरणातून गोळीबार : प्रेयसीची हत्या करत प्रियकराने संपविले आयुष्य !

    February 28, 2026

    जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थी न्याय क्रांती मोर्चा: विविध शैक्षणिक समस्यांविरोधात अभाविप आक्रमक

    February 28, 2026

    आंध्र प्रदेशात फटाक्यांचा भीषण स्फोट; १८ ठार !

    February 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.