जळगाव : प्रतिनिधी
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु होण्याच्या तयारीत असतांना या काळात गुन्हेगारीवर आळा बसावा यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा आणि जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्याच्या अंतर्गत स्थानबद्धतेची मोठी कारवाई करण्यात आली असून यातील एकाला कोल्हापूर तर इतर दोघांना नागपूर मध्यवर्ती कारागृहात परवानगी केली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आगामी निवडणुकीच्या आणि सणांच्या पार्श्वभूमीवर वाळू तस्कर, अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणारे आणि धोकायदायक व्यक्ती यांच्यावर आळा बसावा, या अनुषंगाने अमळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार विशाल दशरथ चौधरी वय-३२, रा. भोईवाडा अमळनेर, पारोळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार सुनील उर्फ सल्ल्या लक्ष्मण कोळी वय २९, रा. पारोळा आणि जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार वैभव विजय सपकाळे वय-१९ रा. आसोदा ता. जळगाव यांच्यावर एमपीडीए कायद्यांर्गत कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला. तिघांवर वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर यापुर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. परंतू त्यांच्यात कोणताही बदल झालेला दिसून आला नाही. त्यामुळे तिघांवर एमपीडीए कायद्यांर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्याबाबतचा अहवाल तयार करून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे पाठविण्यात आला.
दरम्यान जिल्हाधिकारी यांनी या अवाहलाचे अवलोकन करून एमपीडीए अंतर्गत तिघांवर स्थानपद्धतीची कारवाई करण्याला मंजूरी दिली आहे. यातील गुन्हेगार विशाल दशरथ चौधरी यांच्यावर वेगवेगळे ७ गंभीर गुन्हे दाखल असून त्याला कोल्हापूर कारागृहात रवाना करण्यात आले, गुन्हेगार सुनील उर्फ सल्ल्या लक्ष्मण पाटील याच्यावर वेगवेगळे ११ गंभीर गुन्हे दाखल तर वैभव विजय सपकाळे याच्यावर ५ गंभीर गुन्हे दाखल असून दोघांना नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.