Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चिंचोलीत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिरात 500 रूग्णांची तपासणी ; गुलाबभाऊंनी केली रुग्णांचे विचारपूस !
    जळगाव

    चिंचोलीत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिरात 500 रूग्णांची तपासणी ; गुलाबभाऊंनी केली रुग्णांचे विचारपूस !

    editor deskBy editor deskOctober 3, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून जीपीएस मित्र परिवार व शंकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानाने चिंचोली येथे मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिराचे आज आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून कुसुंबा, चिंचोली, धानवड, उमाळे, रायपूर, कंडारी, वराड, जळके, विटनेर, शिरसोली येथील नागरिक तपासणीसाठी आले होते. यावेळी 500 रुग्णांची तपासणी करण्यात आली तसेच यातील 95 रुग्णांना गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी पनवेल येथे रवाना करण्यात आले.

    चिंचोली येथील साईबाबा मंदिरात जीपीएस मित्र परिवारातर्फे व शंकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कुसुंबा, चिंचोली, धानवड, उमाळे, रायपूर, कंडारी, वराड, जळके, विटनेर, शिरसोली येथील नागरिक नेत्र तपासणी व ऑपरेशनसाठी आले होते. यावेळी 500 रुग्णांची तपासणी करण्यात आली आणि 95 रुग्णांना मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी पनवेल येथे रवाना करण्यात आले आहे. रुग्णांना पनवेल येथे पाठवीत असताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रुग्णांची विचारपूस केली.

    याप्रसंगी शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवराज पाटील, धरणगाव तालुका प्रमुख शमुकुंदराव नन्नवरे, शिवसेना उपतालुका प्रवीण परदेशी, उपतालुकाप्रमुख राजू पाटील, तालुका समन्वयक देविदास कोळी, युवासेना उपतालुका प्रमुख अतुल घुगे, जेष्ठ शिवसैनिक नारायण अप्पा, धानवडचे सरपंच संभाजी पवार, चिंचोलीचे सरपंच किरण घुगे, ज्येष्ठ शिवसैनिक कैलास बिराडे, ग्रा पं सदस्य जीतू पोळ, ग्रा पं सदस्य हरीलाल शिंदे, उपसरपंच संजय राठोड, नाना पवार, बबलू देशमुख, योगेश सोनवणे, भाजपचे विलास घुगे, प्रवीण पाटील, विलास सोनवणे, आकाश पाटील युवा सेना यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक व शिवसैनिक उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ग्रंथदिंडीपासून ग्रंथोत्सवापर्यंत… जळगावात वाचनसंस्कृतीचा जल्लोष

    March 24, 2026

    धरणगाव महाविद्यालयात तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात निरोप समारंभ !

    March 24, 2026

    धरणगावात भरवस्तीत डबल चोरी; बंद घरांचे कुलूप तोडून १.७८ लाखांचा ऐवज लंपास

    March 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.